पर्यावरण
पर्यावरण
करू रक्षण वृक्षाचे
पानांचे फुलांचे
झाडांचे वेलींचे
फळा फुलांचे ॥ १ ॥
झाडे लावू या
झाडे जगवू या
ऑक्सिजन मिळवू या
वनौषधी पासुनी ॥२ ॥
आम्ही बालके सान
आम्हा झाडांचा अभिमान
वृक्षतोड थांबवूनी
पर्यावरण वाचवू या ॥३ ॥
झरे खोल करूनी
पाणी साठा वाढवू या
प्रदूषण कमी करूनी
स्वच्छ हवा घेऊ या ॥४ ॥
निसर्गराजा थोर आहे
आभार त्याचे मानू या
वृक्षतोड करणाऱ्यांना
कठोर शिक्षा करू या ॥५ ॥