पर्यावरण...
पर्यावरण...
अथांग अश्या सागरात
माड वाकुनी नमत घेतो
आभाळ येते भेटीला अन्
धरतीला मृदगंध सुटतो ...
क्षितीजावर इंद्रधनु चढता
रंगाची उधळण करतो
खळखळ करणाऱ्या नदीत
मुळे सोडून तो धन्य होतो ...
वृक्षवल्ली पशु पक्षी किती
किती विविधता ही जैवाची
या वायुच्या आवरणात
फुलली कळी जिवनाची...
हिरवागार प्रपंच सृष्टीचा
अदभुत नजारा पर्यावरणाचा
नको दूषित कराया आपण
विषय सखोल हा अभ्यासाचा ...
वृक्षलागवड ही निरोगी जिवनाची गुरुकिल्ली आहे .
पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
सौ. मनीषा आशिष वांढरे...
