प्रवाहा विरूद्ध
प्रवाहा विरूद्ध
प्रवाहाच्या विरुद्ध
चालतांना नित्य
मनात युद्ध
कर्म सत्य
जे शुद्ध
कृत्य
जे
निर्णयक्षम काम
यश गाठतांना
मनात ठाम
कौशल्यांना
सक्षम
माना
हो
अडथळ्यांच्या वाटे
दु:खाचे सावट
रानात दाटे
उमरट
पहाटे
थाट
रे
एकला चालण्याची
स्पर्धा स्वत:शी
ठाम यशाची
निर्णयाशी
मनाची
कुशी
रे
