STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

प्रवाह

प्रवाह

1 min
217

मी परत येइन सर्वांकडे एकच आहे सांगणे 

जरी पडलो एकटा विसरेन कसे मी जगणे


आता काहीसे जरी वाटते मला एकटे 

व्हावे सारे पुन्हा एकदा पूर्वीसारखे नेटके 


मनातली अशांती काहीशी स्थिरावली आहे 

नियतीने मात्र माझी माणसं हिरावली आहेत 


आता पुन्हा नवा प्रवास वाट बघतो आहे 

आठवणींना उजाळा देत मी जगतो आहे 


विस्कटलेली घडी आता बसवायची आहे 

जुनी विन पुन्हा एकदा उसवायची आहे 


मित्रांनो परत हसायला शिकायचं आहे 

पूर्वी सारख आनंदी नव्यान दिसायच आहे 


सुरू केलाय प्रवास थांबा शोधायचा आहे

जीवनाच्या प्रवाहात पुन्हा पोहायच आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy