STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

प्रत्येक जन्मी माझी हो

प्रत्येक जन्मी माझी हो

1 min
188

प्रत्येक जन्मात सखे तू 

माझ्यासाठी जन्म घे 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||0||


स्पर्श तुझा मनाला 

गारवा देऊन जातो ग 

प्रेमाच्या या विश्वात 

मला घेऊन जातो ग 

तुही या विश्वामध्ये 

चल मला साथ दे 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||1||


वाट खूप पाहिली 

सतत शोधत होतो तुला 

उशीर केलास यायला 

माझ्या सुंदर प्रेमफुला 

पुन्हा गतजन्मीच्या 

गोड अनुभूतीत ने 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||2||


तूझ्या माझ्या भेटीची 

ओढ मनी खोल होती 

कामना मनात तुझी 

सखे अनमोल होती 

करायचं साकार आहे 

स्वप्न पाहिले मी जे 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||3||


खात्री मला होती तू 

माझ्यासाठी येणारच 

उशीर झाला तरीही 

माझ्यापाठी येणारच 

विसरून जाऊ प्रीत सखे 

इतकं सोपं नाही हे 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||4||


जन्मोजन्मी भेट सखे 

अशीच होत आली ग  

आठवते या जन्मीची 

भेट कशी झाली ग 

स्पर्शून जातात हृदयाला 

हृदयस्पर्शी क्षण ते 

प्रत्येक जन्मी माझी हो 

अशीच माझ्या मिठीत ये ||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance