परतीच्या वाटा....
परतीच्या वाटा....
आता धूसर झाल्यात किंबहुना
संपुष्टातच आल्यात म्हणा ना...!
"भूतकाळ" कितीही हवाहवासा वाटला तरी
"वर्तमान" आपलं आजचं "अस्तित्व" आणि
येणारा पुढचा दिवस आपलं "भविष्य" आहे.
"गेलेले दिवस" परत फिरून कधीच येत नाही.
मात्र परतीच्या वाटा खुणावत राहतात सतत;
जरा त्यांचा मागोवा घेऊन...
परतीच्या वाटेच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर
एकदातरी झुलून नक्कीच यावं;
आणि मग त्या परतीच्या वाटेची "सुगंधित कुपी"
कायम मात्र मनात जपून ठेवावी.
आणि हो.....
परतीच्या वाटांच्या "पाऊलखुणांची"
जाणीव ठेवून,
नवीन आयुष्याची सुरवात करावी.
