परतीचा प्रवास
परतीचा प्रवास
मोकळी ही जागा सारी, रिकामी झाली वाट.
पाखराच्या पिल्लांनीही, घरट्याला दाखवली पाठ.
हा कसला प्रवाह, वाहून नेत आहे सर्व.
संपेल किंवा टिकेलही, थकलेले हे एक पर्व.
आस लागली आपल्यांची, असंख्य पाऊले रस्ता तुडवी.
आशेच्या आसवांनी, दुखांना त्या मडवी.
जाणवत नाहीत यातना, समोर मरण असताना.
नियतीने निसर्गाला पाहिले नाही, अस कधी गप गार बसताना.
बसले ते सर्व काही, मार्ग काही मिळेना.
अजाण शत्रू ठाण मांडूनी, परतीला काही पळेना.
पळेल तो नक्कीच, बस थोडा वेळ लागेल.
मात कशी केली मरणावर, गाथा वृद्धकपाळा सांगेल.
एकच विचार करतोय, मोकळ्या वाटेचा सहवास.
कधी संपेल काय माहीत, हा परतीचा प्रवास.
