STORYMIRROR

Babu Disouza

Inspirational

3  

Babu Disouza

Inspirational

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

1 min
482

घनदाट ढगांचा धूसर पाऊस 

आडवा तिडवा वेडसर पाऊस 


आरास सरींचा घनघोर पाऊस 

निथळत्या दरींचा मुजोर पाऊस 


संततधार मुसळधार पाऊस 

भिजल्या पंखांत अनिवार पाऊस 


मनामनांत रूजून येई पाऊस 

दशदिशांत सजून येई पाऊस 


कधी थोडका मोजून येई पाऊस 

पुनःपरतीचा गर्जून येई पाऊस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational