STORYMIRROR

Akshay Mahajan

Romance

2  

Akshay Mahajan

Romance

प्रश्न...

प्रश्न...

4 mins
2.5K


शब्दात वर्णन कसे करु तुला? 

पुस्तकातल्या पाठामध्ये वाचु कुठे तुला? 

आवडत्या गाण्यामध्ये ऐकु कुठे तुला? 

हेच प्रश्न विचारतो माझे मी मला? 

पानांच्या रंगांमध्ये दिसशील का कधी? 

भेटशील का कधी वेळेच्या आधी? 

होईल का कधी नजरानजर साधी? 

कधी संपेल या प्रश्नांची व्याधी. 

पहिल्या पावसात ओलं करशील का मला? 

उन्हाळ्यात थंड वार्‍याने स्पर्श करशील का मला? 

हिवाळ्यात सुर्यकिरणाने जाणवशील का मला? 

या सर्व ऋतूंमध्ये कधी मी जाणवेल का तुला? 

प्रश्न तर प्रश्न असतात, 

उत्तरे त्यांची शोधावी लागतात. 

हे तर प्रश्न माझे आहेत, 

मात्र यांची उत्तरे तुझ्यात आहेत. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance