STORYMIRROR

Akshay Mahajan

Others

3  

Akshay Mahajan

Others

श्रमाची माती...

श्रमाची माती...

1 min
230

कशी असते रे शेतकरयाची माती,

जशी मायलेकाची रे नाती.

आयुष्यभर मायेनं मातीला जपतो,

कष्ट करुन तीच्यावर राबराबराबतो.


जन्मभर तीच्यावरच असतो अवलंबुन,

नव्या रुपाने सजवतो तीला नांगरुन.

नव रोप लावुन तीच्यावर सोडुन देतो,

तीही करते मदत अखेर शेतकरी राजा हसतो.


शेतकरयाची जमीन पाहुन मोजतात त्याची श्रीमंती,

कारण तीच तर असते त्याची खरी संपत्ती

दुष्काळामुळे जमीनीही रुप पालटत आहे

ज्यामुळे शेतकरीही आता रुसत आहे.


चला करूया आपण पाण्याचे संवर्धन ,

ज्यामुळे कमी होईल मातीचे पतन.

करुया आपण शेतकरयाला मदत,

आपल्यालाच होईल ज्यामुळे फायदा परत


साहित्याला गुण द्या
लॉग इन