महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा


फुलेंनी शिकवीला धडा समतेचा,
शिवरायांनी शिकविला सन्मानाचा .
टिळकांनी शिकविला स्वातंत्र्याचा ,
सर्वांनी मिळुन बनविला धडा महाराष्ट्राचा.
दाभोळकर, पानसरेंच्या हत्येने बसतो ठपका,
तर अवकाळी पावसाने शेतकरी घेतो धसका
बेळगावचा सिमाप्रश्न राज्याला पडतो,
अनेक संकट पेलून महाराष्ट्र उभा ठाकतो.
जगात प्रसिद्ध केले राज्याला बाबासाहेबांनी
तर राज्याला चालविले यशवंतरावांनी.
सन्मानाने लढायला शिकवीले बाळासाहेबांनी,
तर चित्रपटसृष्टित सुवर्णकाळ आणला दादासाहेब फाळकेंनी .
शेवटी येईलच पुरोगामीत्वाचेच पर्व ,
असायला हवा महाराष्ट्रावर गर्व.
शेवटी असायला हवी प्रजाच राजा,
कारण मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा.