STORYMIRROR

Akshay Mahajan

Others

3  

Akshay Mahajan

Others

अंधश्रध्दा

अंधश्रध्दा

1 min
385

आहे भारत देश आधुनिक,

त्यातील लोक आहेत प्रामाणिक.

मात्र काही वापरतात अंधश्रध्देचा मार्ग चुकीचा,

नंतर नियतीच करते त्यांचा खेळ बाकीचा.


कुणी घालते बचावासाठी काळेदोरे,

मात्र यामागे असतात काही वेगळेच धागेदोरे

कुणाला लागते नजर तर कुणाला होते बाधा,

मात्र हा असतो मानसिकतेचा खेळ साधा.


अंधश्रध्दा दूर करणे होते एक स्वप्न,

दाभोलकरांनी केले त्यासाठी प्रयत्न.

भूत, प्रेत, काळीजादू 'बाबा' आणतात समोर,

मात्र शासनांच्या नियमांपुढे हे सगळेच असतात चोर.


गुप्तधन शोधण्यासाठी शॉर्टकट शोधतात,

गंडवल्यानंतर मात्र गुपचुप बसतात.

सगळी सुरक्षा एका काळ्या दोऱ्यावर सोपवतात,

कोणतेही कार्य करण्यापूर्वी एक लिंबू मात्र टांगतात.


Rate this content
Log in