STORYMIRROR

Akshay Mahajan

Others

3  

Akshay Mahajan

Others

आई बाबा

आई बाबा

1 min
293

तुमच्या कडुन त्यांना काहीही नको आहे,

आणि जे हव आहे त्यात तुमचच तर भलं आहे.

दुसर्‍यांच्या आनंदात कोण सुखी असु शकतो,

आपल्यापेक्षा जास्त प्रगती कोण पाहु शकतो.


अहो त्यांच्या अपेक्षा तर मोजक्याच आहे,

आणि आपल नैराश्य तर रोजचेच आहे.

त्यांच्या अडचणी तर पर्वतासारख्या आहे,

आणि आपल्यासाठी संधी तर समुद्रासारख्या आहे.


वडीलांच्या रागावण्याची सर्वांना सवय असते,

आईची माया तर सर्वांना हवीहवीशी असते.

आपण दुर गेल्यावर त्यांची किंमत कळते,

त्यांच्या अनेक आठवणींत डोळ्यात अश्रु टिपते.


तुमच्या मुळे होणारे दुख त्यांना नको असते,

मात्र तुमच्या मुळे येणार हसू त्यांना लाखमोलाचे असते.

तिकडे कोण्या परक्या ह्रदयासाठी तुम्ही वेळ घालवतात,

ईकडे तुमच्यासाठी दोन ह्रदय मात्र धडधडतात.


Rate this content
Log in