STORYMIRROR

Akshay Mahajan

Romance Others

3  

Akshay Mahajan

Romance Others

माझा छंद... कविता

माझा छंद... कविता

1 min
476

लिहितो मी तर माझ्यासाठी, 

मात्र वाटत का ते आहे तुझ्यासाठी. 

शब्द तर माझे असतात, 

मात्र तुझ्यासाठीच का ते वळतात? 


जरी बसलो मी निवांत क्षणी, 

तरी चालते डोक्यात शब्दांची पेरणी. 

जर असली हातात लेखणी, 

उलगडतात शब्द जे असतात मनी. 


ठेवला जरी मनावर ताबा दरवेळी, 

तरी हळूच येते एक गोड शब्दांची साखळी. 

कळत नाही काय आहे एकदाच, 

नातं मात्र वेगळच आहे पेन आणि कागदाचं. 


खळी जरी पडली गालावर, 

हसु जरी आलं ओठांवर. 

इतकं पुरेस असत मला, 

येण्यासाठी शब्द तुझे कागदांवर. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance