STORYMIRROR

Akshay Mahajan

Romance

4  

Akshay Mahajan

Romance

पाऊस आणि ती

पाऊस आणि ती

1 min
492

आठवण तुझी जणू पावसासारखी,

कोसळणाऱ्या सरींसारखी, दाटलेल्या मेघांसारखी.

रुप तुझे जणू टपोऱ्या थेंबासारखे,

गालांवरुनी ओघळणारे, डोळ्यांमध्ये सामावणारे.


हळूच लेखणी हातात घ्यावी,

आणि तू पावसासारखी कागदावर यावी

आता भिजण्याचीही मजा वेगळीच असते,

आणि तुला कवितेसारखं लिहिण्याची जणू सवयच असते


अशा वातावरणात वाटत सारं विसरून जावं,

धो-धो बरसणार्‍या पावसात चिंबचिंब भिजावं

मनातलं सर्वकाही एका क्षणात बोलावं,

आणि सोबत कोणीतरी एक 'आपलं' असावं


काळ्या मेघांमधुनी हळूच सूर्यकिरण यावा,

आणि इंद्रधनुष्यात तुझाच चेहरा दिसावा

वाटतं असं कधीतरी एक क्षण असावा,

पाऊस आणि मी तुझ्यासोबत असावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance