STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract

3  

manasvi poyamkar

Abstract

प्रश्न माणुसकीचा...

प्रश्न माणुसकीचा...

1 min
297

मनाला जेव्हा प्रश्न पडतात

तेव्हा ते उत्तरासाठी आतुर होते

पण जेव्हा प्रश्नच सापडत नाही

तेव्हा ते बैचेन होते...

आणी मग हे बैचेन मन सर्वत्र धावू लागते

प्रश्नाच्या शोधात

..

पण जगातील दृश्य पहाता त्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहित...

कारण ह्या जगात उत्तर नसली तरी प्रश्न तयार आहेत

पावला पावला वर...

धर्म जात पंथ हे सारेच तर आपुलकी शिकवतात

मग द्वेषाचा वणवा कसा जन्माला येतो..

प्रार्थनांचे सुर कसे आरोळ्यात बदलतात

अन अट्टाहास सुडाचा एक ध्यास होवुन जातो...

कधी कोनाच्या आपुलकीचा प्रश्न पडतो

तर कधी कोणाच्या द्वेषाचा

विचारांती मन निरुत्तर होते

कारण प्रश्न असतो भावनांचा ..

मी राम म्हणू की अल्लाह

मी देव म्हणू की दानव

गुंतलो आहे कोड्यात

कारण विसर पडलाय माणूसपणाचा..

होळी खेळताना मी रंगाच्या भाव विश्वात हरवतो

त्या दिवशी प्रत्येक रंग माझा असतो

मग भगवा की हिरवा

हा भेदभाव मनी नसतो..

मग एके दिवशी तोच रंग प्रश्न बनतो जन्मामरणाचा

कारण प्रश्न असतो अस्मितेचा..

हळू हळू हा वणवा असाच पेटत रहातो

आणी एक एक चिता आहुती देत रहाते

जो जळतो तो मानव नसतो

फक्त असतो हिन्दु कींवा मुस्लिम

अन धर्माच्या या रणांगणात

निरुत्तर राहुन जातो प्रश्न माणुसकीचा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract