STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

परोपकारी भावना

परोपकारी भावना

1 min
253

जगण्या जीवन सार्थ असे हे,

ठेवुनी मनी जाणीव, उपकार

नको फुकाचे जगणे अमंगळ,

धन्य करावा जन्म, संसार. १.


चित्त असावे कोमल, निर्मळ,

उदयास येतो शांत विचार,

पुसता अश्रू दीन जनांचे,

समाधान चित्ती अपरंपार. २.


आधार होऊनी वेळ जपावी,

माणुसकी नजरेत असावी,

पुन्हा न येणे हेच जीवनी,

सत्किर्ती ती मागे उरावी. ३.


हीच संस्कृती ,हीच शिकवण,

मनुष्यजन्मा तुझे हे संस्कार,

आभाळापरी विशाल असावे,

सदैव हृदयी परोपकार. ४.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract