प्रलय
प्रलय
क्षण पावसाळी मनी येता
क्षणात भान हरपून जाते
आला आला पाऊस म्हणता
सर झेलया मन हे धावते
परी जीणं दुखी करता
प्रकोप पावसाने केला
जरा मन हे विसावता
काळ पुढे सरसावला
महा प्रलया ची ती वार्ता
भयाण काळ तो बरसला
पाऊस जिवन देता देता
प्रकोप निसर्गाने दावला
पाहुणी होती घरी आली
नेले सारे तिने वाहुनी
कोणाचेही ना आभारी
गेली सारेच डाव मोडूनी
पुराची कहाणी काय ती
आयुष्याची दिशा ती गेली
सगळी कडे पाणी च पाणी
सारेच बदलले या प्रलयानी
