पर्जन्यसत्र
पर्जन्यसत्र
सुटला भरार वारा
झाला ढगांचा पसारा
त्यांना विजेचा दरारा
झरल्या पाऊसधारा
-१-
सुटला मातीचा गंध
आसमंतात सबंध
भारला श्वासांत सारा
खाली उतरला पारा
-२-
स्पर्शता यौवन मद
पुलकित गदगद
ओलेत्या देहात सारा
कसा पेटला निखारा
-३-
गुलकंदी शीतलता
थरारल्या वेली लता
झेपावताना आधारा
संजीवन दे आजारा
-४-
