STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Abstract Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Abstract Tragedy

प्रियाआस...

प्रियाआस...

1 min
185

ह्या उन्हान करपून निघालेल्या जमिनीस भेटण्याची आस घेऊन तिचा प्रियकर "पाऊस" सरी होऊन आला.


दोन ऋतूंच्या तपानंतर तो तिला भेटला; त्यांच्या मिलनाने जमीन सुगंधीत झाली,

तर विजांनी फटाके फोडले, अधूनमधून वारा ही तिला साथ देत होता.


खरंच, पहिला पाऊस येतो, अन् सार-सार शांत करतो,                                

पहिला पाऊस 'गुलाबी चाहूल'त्यात हरवलेल्या 'क्षणांची काहुल' ;


मग त्याची आठवण का नाही येणार?

मी तर अजूनही त्याच्या विरहाच्या "वैशाखवणव्यात" जळतीये,


तो कधीतरी माझ्या 'प्रीतीच्या आसेने' येईल; याचीच मी, वाट पाहतीये.                  

अन्...


डोळ्यातल्या त्याच्या प्रीतीच्या पावसाला बरसण्यासाठी वाट मोकळी करतीये.


माझ्या 'प्रियास' कोण सांगेल हा निरोप?

ह्या पावसानं सारी सृष्टी विसावली... तृप्त झालीये;    

पण...

पण,

मी अजूनही त्याच्या मिलनासाठी अतृप्त राहिलीये...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract