परिवर्तन कुठे गेले ?
परिवर्तन कुठे गेले ?
शाहू, फुले, आंबेडकरांचे
अनुयायी सारेच झाले ,
अरे सांगा आम्हा हवे ते
परिवर्तन कुठे गेले ?
ओळखून आहे तुम्हा जग सारं
कुंपणच शेत खाणार कुठवर?
भरता किती घरं आपलीच तुम्ही
इथे आहेत सारेच लबाड कोल्हे..
कळलाच नाही महांत्म्यांचा आदर्श
झाला नाही त्यांच्या विचारांचा स्पर्श,
घात तुम्हीच तर केला रे
तुमचेच पोट मोठे झाले...
कोण कुणाचा इथे वाली
नुसती भाषणं गोड झाली,
तुम्हीच अंधार फार केला
जागल्यांना झोपविले...
विझून गेल्या क्रांतीच्या मशाली
कशी इथे ही काळरात्र झाली,
शंडा हाती झेंडे कसे रे
नुसतेच महात्म्यांचे पुतळे उभारले...
करून गर्जना देताय नारा
केवढा स्वार्थ कोण आहे खरा?
स्वतःस म्हणती नेता सारे
लाचार, गद्दार,विकलेले...
शिकलेल्यानी फसविले
स्वतःच मोठे ते फार झाले,
नाही कामी काहीच ते आले
नाही कळले शाहू, फुले...
