प्रित वेड लावी जीवा
प्रित वेड लावी जीवा
प्रेमात पडलो तुझ्या
झालो मी प्रेम खुळा
कळणार कधी तुला
प्रित वेड लावी जीवा
प्रित वेड लावी जीवा
सारेच का म्हणती असे?
जळी , स्थळी, काष्ठी, पाषाणी
फक्त तीच का हो दिसे?
सगळ्यात सोपे असते
देवू नये होकार प्रेमा
त्या आधीच हो घडते
प्रित वेड लावी जीवा
हुरहुर काहुर
ठाव न लागे मनाचा
सारेच म्हणती आता
प्रित वेड लावी जीवा