परिसरातील फुले
परिसरातील फुले
🌺🌺🌺🌺 🌺🌺
सृष्टीत सुशोभित करती सुगंधित फुले ही पुष्पकोशातून उमलणारी
चराचर गंधाळून देती आणि बनती सुख-दुःखाचे वाटेकरी
फुले ही विविध प्रकारची
कधी स्पर्शती ईश्वरचरणी
तर कधी देहाला आलिंगन देती
मंगल कार्यात प्रथम मान घेऊनी
अविभाज्य गाभा आपल्या जीवनाचा रचती
स्वागत करण्यास सदैव पुढे असती कधी प्रतीक बनून ही साक्ष प्रेमाची देती तर कधी गळ्यात पडून सन्मान देती
फुले ही बहुरूपी
कधी गजरा होऊन केसांत माळली जाती तर कधी कोणासाठी चुरगळून जाती
सुख दुःखात समान मानूनी
सदैव आनंदी राहती
तर कधी
आयुष्य मोहक करून सुगंधापरी आठवणी देऊन जाती
खुलत रहावे हसत रहावे सदा
आपणास शिकवण देती फुले ही
उमलणारी...
🌺🌺🌺🌺🌺
