STORYMIRROR

Vasudha Naik

Romance Others

3  

Vasudha Naik

Romance Others

प्रीतफुला....

प्रीतफुला....

1 min
204

प्रीतफुला रे प्रीतफुला

पहाटे पहाटे प्राजक्तासारखे उमलूया

दाही दिशा सुगंधीत मस्त करूया

इंद्रधनूच्या उंच झुल्यावर झुलूया....


मोगर्‍यापरी स्वच्छ शुभ्र निष्कलंक राहूया

अवघे आसमान सुवासिक करूया

पंख स्वप्नांचे लावून मग उंचच उंच

गगन भरारी घेवून विश्वात रमूया.....


सजणा साथ हवी तुझी मला

संगतीत तुझ्याच मी राहीन स्वच्छंदी

जीवनातील सर्व अनमोल क्षण 

घालवीन तुझ्याच सोबतीने आनंदी....,


माझ्या प्रीतफुला जीव जडला रे

मनापासून खास सजणा तुझ्यावर 

प्रीतीचे मुल्य कळलं तुलाही आता

माया खूप करतोस तू माझ्यावर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance