प्रीती
प्रीती
हातात हात गुंफून , प्रीत कधी जुळली
हे कळलंच नाही
दोन डोळ्यांच्या बेरजेमधी , प्रेमाचं वाढतं गणित
हे उमजलंच नाही.
एकमेकांचे होऊन , मनं कधी जुळली
हे समजलंच नाही
एक मनाने अधीर होऊन , प्रीत कशी एकरुप झाली
हे कळलंच नाही
लाजरी प्रीत , लग्नाच्या जंक्शनला कशी गेली
ते उमजलंच नाही
शुभमंगल होताच , नाते बदलले
हे समजलंच नाही
संसारचक्रात अडकल्यावर , सर्व काही समजले
हक्काचे प्रेमाचे , नवराबायकोचे नाते
पूर्णपणे उमजले!!
