प्रीत वेड
प्रीत वेड
जिथे पहावे तेथे दिसते
तुझीच रे हसरी मूर्ती
आठवत असतात सदा
तुझेच मधाळ शब्द
मोहवत असते मला
तुझ्या ओठांवरचे स्मित
जाणवते नजरेतील साद
त्यातले प्रितीचे बंधनही
अन् राग अनुराग माझा
त्यातच विरघळतो सारा
सारी बंधने तोडून हवे मज
तुझ्याच रे प्रितीचे वेडे बंध

