प्रीत तुझी-माझी...
प्रीत तुझी-माझी...
धुंद तुझ्या प्रीतीत फुलली रातराणी
आसमंती सजली जणू चटक चांदणी
लोभस वेली सजली धवल फुलांनी
प्रेमप्रियाचे वार जी अलगद झेलूनी
शब्दफुलांचा सडा पसरला अंगणी
मोहरले मन हे तुजसवे रंगूनी
शहारले रोम-रोमी सखया गंधफुलांनी
प्रणयाचे गूज मग ओठी झंकारूनी
नशा अलवार दाटी गाली ओघळूनी
धुंद प्रणयात पहाट ही उजळूनी
शब्दगंध शब्दबाण हृदयांतरी सजवूनी
लाजले मी निरागस भाव मनी दाटूनी

