STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

प्रीत माझी मुकी

प्रीत माझी मुकी

1 min
166

प्रीत अनोखी कळेना 

तुला माझ्या नयनात,

जरी बंधने ओठात 

छबी तुझीच मनात..!!१!! 


सावरता भावनांना 

डोळ्यातल्या आसवांना, 

समजून नाही घेत 

मुक्या माझ्या इशाऱ्यांना..!!२!! 


अशी माझी प्रीत सख्या 

कळणार नाही तुला, 

मनातल्या शब्दांसाठी 

वाट नाही देत मला..!!३!!


प्रीत माझी मनातली 

मनातच दबणार, 

माझे प्रेम कळण्यास 

व्यक्त व्हावे लागणार..!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational