STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रीत अंतरी

प्रीत अंतरी

1 min
2.4K


तुझ्याच साठी जागते

अंतरी ही प्रीत

तुज ठाउक नाही साजणा

प्रेमाची छळन्याची ही रीत

हुरहूर सदैव मनी

झोप नाही लोचनी

आठवणींचा अश्रू अलगद घरंगळतो

जेव्हा लवते पापणी

आठवणींचा पाऊस पडतो

माज्या अंगणात

मृगजळ हे बंधनाचे

दिसते मज स्वप्नात

ज्या वाटेवर वळवलीस तू पाऊले

पाउल माझे थबकतील तिथेच

तू येण्याची आस न झुरावी

वाट पाहीन मी इथेच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance