STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

3  

Rohit Khamkar

Inspirational

परीक्षा

परीक्षा

1 min
288

आयुष्य जगत असताना, द्यावी लागते प्रत्येक क्षणाला.

कसोटीचा कस, आणी तयारी लागते मनाला.


कधी शिकतो कधी शिकवतो, एक एक तो अनूभव.

जिंकण्यासाठी का होईना, पहावी पराभवाची चव.


समृद्ध बनवतो कणखर बनवतो, प्रत्येक तो प्रसंग.

पकडूनही उभे राहण्याचा, हा वेगळाच असतो व्यासंग.


कधी भिती कधी ओढ, वाटते मला भेटायची.

निर्भीड मनाने वेळ आली, आता तुला खेटायची.


तुझाही अंश तोच, फक्त अवतार बदलतात.

वेगवेगळ्या रूपाने का होईना, दर्शन तूझे होतात.


तपासण्या सर्व काही, पणाला लावी ती दीक्षा.

टप्याटप्याने येतात, या नवनव्या परीक्षा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational