प्रेमरंग
प्रेमरंग
रंग हे बघ मनोहारी
पाठविलेत तुज साठी
रंगात रंगून जावेस
सखे तू मजसाठी ....!
रंगात रंगता तुझ्या
भासे वेगळे जग सगळे
उघडता तू मनाची दारे
वाहू लागे प्रीतीचे वारे ...!
रंगात रंगुनी गेलोत
रंग सारे खुलुनी आले
बघ रंगपंचमीत या
प्रेमरंग गहिरे झाले ....!

