प्रेमकहाणी आहेस तू
प्रेमकहाणी आहेस तू
परिकथेतील सुंदर मोहक
जणू राणी आहेस तू
माझी तर उमललेली
प्रेमकहाणी आहेस तू || 0 ||
भाळलो तुझ्या रूपावर
भान कसले राहिले ना
इतकं मोहक सौंदर्य
मी कधी पाहिले ना
सौंदर्याच्या मोहक अशा
खाणी आहेस तू
माझी तर उमललेली
प्रेमकहाणी आहेस तू || 1 ||
सुरात आलं जीवन माझं
बेसूर हे झालं होतं
काहीतरी गवसत नव्हतं
खूप नैराश्य आलं होतं
हृदय खुलवणारी सूरेल
गाणी आहेस तू
माझी तर उमललेली
प्रेमकहाणी आहेस तू || 2 ||
जीवनदान देणाऱ्या
पाण्याचा रंग तू
पाण्यावर उठणारी
नाजूक तरंग तू
मंतरलेलं जणू जादूचं
पाणी आहेस तू
माझी तर उमललेली
प्रेमकहाणी आहेस तू || 3 ||
कोकिळेचा स्वर तुझा
ऐकत राहावे वाटतं
एकटक सतत
तूला पाहावे वाटतं
गोड कर्णमधुर अशी
वाणी आहेस तू
माझी तर उमललेली
प्रेमकहाणी आहेस तू || 4 ||

