प्रेमाला बंधन नसते
प्रेमाला बंधन नसते
प्रेम हे कधीही कुठेही
कुणावर ही होऊ शकते
प्रेमाला कुठलेच बंधन
किंवा कसलीच मर्यादा नसते....
प्रेमाला कधी ही
जात पात धर्म नसते
प्रेमात फक्त दोन निस्वार्थ
मनाच मिलन असते.........
प्रेम हे कधी कुणी कुणाचं
वय बघून करत नसते
-हदयाची स्पंदने जिथे वाढतात
त्यांच्याशी प्रेम होतं असते.......
प्रेम हे शारीरिक मिलन नसून
आंतरिक मनाचे मिलन असते
मनाला जी व्यक्ती आवडायला लागते
त्याच मनाशी प्रेम जुळते........
प्रेम करताना मनावर
कधीच संयम नसते
प्रेम तर राधा कृष्णा मीरा
यांच्या सारखे पवित्र असते.......

