STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Romance Others

3  

Nurjahan Shaikh

Romance Others

प्रेमाची साद

प्रेमाची साद

1 min
149

सागरी किनारी मनास तृप्त करे वारा 

खळखळणाऱ्या लाटा स्पर्शुन जाई, 

प्रेम वेडे एकमेकांच्या प्रेमात गुंग 

हळूवार हातात हात घेऊनी गीत गाई. 


या काठावर देई साक्ष प्रेमी युगुलांची 

हाक ऐकू येई प्रेमाच्या आणाभाकांची, 

सागरी किनारा होणार तू माझा....

भाऊंच्या प्रेमास मिळे साद संगीताची .


बहरले प्रेम या रमणीय ठिकाणी 

फुलले नाते पाहून एक दुजे साठी, 

जन्मोजन्मी अशीच आठवण राहील

रोमांचक क्षण प्रेमाचे आयुष्यभरासाठी. 


सागरास पाहून कळले नाजूक ह्रदयास

कधीही न संपणारी अटळ प्रेम शक्ती, 

चिंब होई किनारा पाण्याच्या तरंगाने 

मन असेच शहारे आठवून प्रेम भक्ती.  


दिसले प्रेम संगीताच्या भावनेतून 

प्रेमाच्या गुजगोष्टी भाऊंच्या आठवणीत, 

जपते मनात पती प्रेमाचा खजिना 

विरहाची वेदना मनात साठवित.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance