STORYMIRROR

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

4  

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

प्रेमाची प्रतीक्षा - 4

प्रेमाची प्रतीक्षा - 4

1 min
253


थंड वारा, धुंद पाऊस धारा... 

   गंध मातीचा चोहीकडे पसरलेला, 

   नभही दाटून येता.... 

  धरती ही कोसळे..... 


 कोसळणार तो पाऊस... 

  मनात आठवणी जाग्या करी... 

 पावसात तुझी माझी भेट... 

  योगायोगाने व्हावी..... 

  

 जीवनाच्या या वाटेने

  चालत जाऊ आपण.. 

चार पाऊले तु पुढे... 

  दोन पाऊले मी मागे... 


  साथ तुझी असताना

   आता कशाचीच भिती नाही.. 

  धरलेला हात सोडू नको... 

    हिच मनाची आर्त भावना


तुझा स्पर्शही मखमलीचा आता हवा हवासा वाटतो... 

  पावसाळ्याच्या या दिवसात

 नवीन आस देऊन जातो.... 


  एकच तुझी आस

    एकच तुझा ध्यास... 

    तु आहेस हा भास

    मनाचा विश्वास 


 प्रत्येक श्वासात तू शेवटपर्यंत

  नव्याने जन्म घेतोय पुन्हा पुन्हा तुझ्या साठीच....

    

     मी पुन्हा येईन... 

     मी पुन्हा येईन... 

     मी पुन्हा येईन...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance