प्रेमाचा नाजूक धागा...
प्रेमाचा नाजूक धागा...
प्रेमाचा नाजूक धागा ,
रेशमी हळवा सुरांचा पावा ,
छेडीता सूर प्रीतीचे ,
मोहूनी घेतो मनाचा ठावा...
गुंतला काळजात असा ,
विस्कटून टाकल्या भावना,
सोडवावा कोणत्या टोकाला,
म्हणतो प्रेमात जीव ओतना ...
लाघवी सौंदर्य तीचे ,
गुंजणार सुमधुर संगीत जसे ,
हरवून जातो तान घेता ,
बोलते अशी आलाप जसे...
श्रावणातली ती मंजुळ स्वर,
भिजली तिच्यात हिरवळ ,
गुलाबी स्पर्शाची गीत मनोहर,
सजते ओठी निखरते शुभ्र काया नितळ...

