STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

प्रेमाचा मुलाधार

प्रेमाचा मुलाधार

1 min
161

प्रेम म्हणजे एक पवित्र निर्मळ भावना,

प्रेमच जुळवते हृदयाच्या स्पंदना,

प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे,प्रेमाने जगावे,

उद्याचं कुणी पाहिलंय आपुलकीने वागावे


प्रेम आहे एक सुंदर कल्पना,

धाग्यामदे गुंफते एकमेकांच्या मना,

प्रेमाच्या दुनियेत अवतरतो चराचर,

निसर्गाच्या प्रेमात तर उल्हासाने येतो बहर


प्रेमाच्या दुनियेत नको अहंकार नको मी पणा,

आपुलकीने विश्वासाने वाढते प्रेमभावना,

प्रेम म्हणजे नसते दोघांचीच जोडी,

नातेसंबंध जपता जपता येते जीवनाची गोडी


प्रेमाच्या दुनियेत होतात सारेच स्वार,

मनापासून प्रेम करेल त्याचा बेडा पार,

प्रेमाच्या दुनियेत नको कसला स्वैराचार,

हाच खरा ठरेल प्रेमाचा मुलाधार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance