STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Action

3  

Supriya Devkar

Romance Action

प्रेमाचा गुलकंद

प्रेमाचा गुलकंद

1 min
271

पहिल वहिल प्रेम आठवल की

अजून ही मनात उखळ्या फुटतात 

मनात साचलेल्या आठवणींच्या 

मग अलगद गाठी सुटतात 


थोडी धाकधूक थोडी भिती 

वाटायची तेव्हा मनात 

कोणाला काही कळू न देता 

वागाव लागायच चारचौघात 


चोरटी नजर माझी नेहमीच 

शोध घ्यायची त्याचा 

समोर येताच मात्र आमची 

बसायची की ओ वाचा 


हळूहळू फुलला होता

प्रेमाचा आमच्या गुलकंद 

सोबतीत फिरताना त्याच्या 

वाटे मज अत्यानंद 


भावना हळव्या होत्या 

मन ही होते वेधंळे 

वाटे सोबतीत त्याच्या 

साजरे करावे सोहळे 


परकेपणा संपून आता 

आपलेपणा आला होता 

शरिरापेक्षा मनातला 

गुंता वाढत गेला होता 


हळव्या मनाला जडला होता 

एकमेव त्याचाच छंद 

आठवणींना स्मरताना 

आजही वाटे आनंद 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance