प्रेमाचा चहा
प्रेमाचा चहा


चहा प्यायला लागते
कशाला निमित्त
जर असेल जोडीला
कुणीतरी आप्त
थोडा वाफाळलेला
थोडा गोड
म्हणतो कसा
प्रेमात पड
चहाचे किस्से
तरी किती नाना
प्रेमी जोडप्याने
चहासाठी कराव्या खाणाखुणा
चहाच जोडतो
सगळी नाती-गोती
बांधून ठेवी
सखी अन् सोबती