STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा

1 min
225

प्रेमा तुझा रंग

होती सारे दंग

मनी पाहती श्रीरंग

आठवणींचे प्रसंग


होती स्वार वाऱ्यावर

प्रेमाचा पसरे सुगंध

उडवीत सप्तरंग

होती सारे बेधुंद


प्रेमाची नशा न्यारी

रंगली सारी यारी

दिल दोस्ती दुनियादारी

देते सर्वांना उभारी


साद प्रेमाची कशी

हळूच मन जडे

होती सारे वेडे

प्रेमवीर ते प्रेमात पडे


फुटे आशेला अंकुर

प्रेमाचा गोडवा मधुर

जीवनाचे सप्तसूर

प्रेमी जीव होती आतूर


गुलाबी रंग प्रेमाचा

क्षण असे आनंदाचा 

संवाद हा मनामनाचा

प्रेम रंगी रंगण्याचा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance