तुला पाहताना
तुला पाहताना
तुला पाहताना.....
तुझ्या नजरेत बंद झालो
पहिल्या भेटीतच
तुझ्या काळजात उतरत गेलो
पाहिले तुला अन्.....
मी हळवा झालो
नाते रेशमी होताना
तुझ्या हसण्यात गुंतत गेलो
पाहून तुला गं सखे......
घायाळ होत गेलो
खळी गालावरची पाहून
मी मनमोकळा झालो
तुला पाहिल्यावर.....
तुझ्यात विलीन झालो
मला पाहता पाहता
तुला कळत गेलो
तुला पाहण्यास.....
मी चंद्र झालो
पौर्णिमेच्या उजेडात गं
तुलाच पाहत गेलो
तुला पाहण्यासाठी.....
आरशास सजवत गेलो
तुझं मागे वळून बघताना
बावरा मी झालो
तुला पाहून झाल्यावर.....
तुझा मी झालो
रुप तुझे लावण्याचे
चित्रात रंगवत गेलो

