STORYMIRROR

padmakar shirsat

Romance

3  

padmakar shirsat

Romance

मोगरा..!

मोगरा..!

1 min
638

माळ सखे केसात चैतन्याचा झरा

धुंद मोगरा साजीरा !!

उरी स्वप्नांचे घेऊन चांदणे

चाललो सखे वेचित काटे !!

रक्त पायी, रक्त हृदयी वेदना ही

न थांबणाऱ्या !!

कोमेजले उन्हाने झोडपले पावसाने

कितीदा झाला स्वप्नांचा चुराडा !!

विसरुनी सर्व पुन्हा मांडियला

नव्याने खेळ सारा !!

अवचित क्षणही गवसले

काही सुखाचे निर्व्याज आनंदाचे !!

त्या क्षणांना स्मरूनी ये

गुंफूनी हात हाती, ऐकूया मारवा !!

धुंद होऊ गीत गाऊ

ओंजळीत घेऊनी मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from padmakar shirsat

Similar marathi poem from Romance