STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Romance

3  

Rajendrakumar Shelke

Romance

घुंगरू

घुंगरू

1 min
349

*************************************

वयात आली, अंगानं भरली,उपवर मी झाली,

अंगापिंडान भरली काया, मुखावर पांगली लाली.!!धृ!!


नाजूक पायी चाळ बांधले,थिरकत आले जवळी,

प्रितीत घेऊन राया,भरल्या कातरवेळी.!!१!!


चला सोबतीने जाऊ,ठसक्यात लावणी गाऊ,

घुंगराची सारी माया,मनात भरून पाहू !!२!!


थयथय करता घुंगरू वाजे, शब्दांच्या तालात,

माझ्या काळजाचा ठाव जाई वाया,मन वेडे घुंगराच्या नादात !!३!!

--------------------------------------------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance