STORYMIRROR

दिपक मुळाणे (पाटील)

Romance

3  

दिपक मुळाणे (पाटील)

Romance

नजर तिची झुकली होती....

नजर तिची झुकली होती....

1 min
313

कॉलेज मधे बघितले तीला, घाबरत घाबरत आली होती...

झाडाखाली बाकासमोर, एकटीच उभी राहिली होती...

रस्त्यावरुन येता-जातांना, बघून माझ्याकडे हसली होती...

नजर चोरून हळुवार, जवळ येऊन बसली होती... 

नकळत बघून माझ्याकडे नजर तिची झुकली होती...


कट्यावर येऊन प्रेमाने घास मला भरवत होती...

हात हाती घेता तीचा लाजून हात सोडवत होती...

तीच्या सवे जगतांना स्वप्ने खूप पाहिली होती....

जवळ येऊन प्रेमाने मिठी तीने मारली होती....

नकळत बघून माझ्याकडे नजर तिची झुकली होती....


लग्न ठरले माझे रडत-रडत बोलली होती....

प्रेमविरह झाल्यावर संसाराकडे चालली होती....

प्रेमात घेतलेल्या आना-भाका सोडून ती गेली होती.....

मला सोडून जातांना काळजी घे बोलली होती.... 

नकळत बघून माझ्याकडे नजर तिची झुकली होती...


खूप दिवसांनी दिसली होती कुणासोबत बसली होती....

पति सोबत असतानाही आठवण मनी दाटली होती....

डोळे ओले झाले तरी बघुन खळखळून हसली होती....

प्रेमाचं नातं आमचं अजून काही विसरली नव्हती....

नकळत बघून माझ्याकडे नजर तिची झुकली होती.... 


खूप वर्ष झाले तिच्या जीवनात व्यस्त झाली होती....

एक दिवस अचानक काठी टेकत आली होती....

सुरकुत्या पडल्या गालावर अजून गोड खळी होती....

शेवटच्या भेटीमध्ये पहिली भेट आठवली होती.....

नकळत बघून माझ्याकडे नजर तिची झुकली होती....


Rate this content
Log in

More marathi poem from दिपक मुळाणे (पाटील)

Similar marathi poem from Romance