प्रेम
प्रेम
न प्रीतीस जागा अनुरूप होती
ह्रदयात इच्छा तर खूप होती
जर राजसा तो रुसलाच माझा
घडणार खोडी गुपचूप होती
नजरेस माझा गुलजार यावा
गुलमोहराची झड चूप होती
व्रण चार केले जर अत्तरांनी !
...जळणार गंधित वर धूप होती
प्रणयास वरती छत ती अनंती...
पुरवीत घातांकित रूप होती!
स्वर बंदिशांचे तुज आणणारे
हमखास त्यांची लय भूप होती