वियोग
वियोग
उपक्रम १९/१२/२०१९
वियोग
*******
मला लागला होता सख्या
तुझ्या प्रेमाचा रोग
मग का सोसावा लागला
अचानक तुझा वियोग.......
तुझ्यासाठी लढत होती
एकटी मी जगाशी
माझ्यासाठी वेळ नव्हता रे
सख्या तेंव्हा तुझ्यापाशी.......
दुःख तुझ्या विरहाचे
गेली मी घेऊन उराशी
जुळलेच नाहीत रे कधी
तुझ्या माझ्या प्रेमाचे राशी.....
वेडी मी तुझ्या प्रेमाची
बनू पाहिली मी तुझी दाशी
तुचं सांग सख्या साजना
तुझ्या वियोगाने जगू कशी?....
होईल तूला ही कधीतरी
माझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव
कळवळून रडशील तू ही
भासेल जेव्हा माझी उणीव.....
आठवशील तू ही सख्या
माझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
शोधेल एक दिवस मलाच
तळमळीने तुझे ही वेडे मन......

