STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance

3  

Swapna Sadhankar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
197

प्रेम म्हणजे

विश्वासाचा आधार

अपेक्षांचं ओझं

त्यात अजिबात नाही

जगतात कर्तव्याचा घेवून भार

ती असतात निव्वळ नाती


प्रेम म्हणजे

निस्वार्थ झोकून देणं

देण्याघेण्याचा हिशोब

त्यात मुळीच नाही

मांडावी लागतात गणितं

जुळवून घेण्यासाठी

ती असतात केवळ बंधनं


प्रेम म्हणजे

दोन अर्धे मिळून एक

तुझं नि माझं असा

वेगळेपणाचा भाव त्यात नाही

मनात जिवंत राहून

मरणही बेहत्तर

मरत मरत प्रेमाविन

जगणं मात्र अर्थहीन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance