प्रेम
प्रेम
सूर्य चंद्र तारे वारा पाऊस पाणी ,
निसर्गाचे शाश्वत सत्य ...
जन्माला येणं हे आजीवन सत्य,
यामागे निर्माण होणारी नाती सापेक्ष
माणसापरत्वे बदलणारी...
नात्यांवर अधिराज्य असते राग, लोभ ,मद ,मोह, मत्सर, प्रेम या शाश्वत भावनांचे ....
यांचे परिवर्तन अंतिमतः फक्त सुख दुःखात होणारे...
प्रत्येक भावनांना स्वतःचे असे असते एक अदृश्य
बंधन,
देश, धर्म , जात, वय या बंधनांना झुगारून
ह्रदयाच्या बंधनात अडकून पडतं ते प्रेम ...
ज्या बंधनांना झुगारलेलं असतं
त्याच बंधनांनी निसटून जातं ते प्रेम....
तुझं- माझं, तीचं -त्याच,
कधी होकारात,तर कधी नकारात
परीवर्तित होणारं, तर कधी विश्वासघात करणारं तर कधी फक्त डागाळून टाकणारं,
यांच्याही पलीकडे जीवनाला व्यापून उरतं ते प्रेम...
प्रेम असत आईचं, कोणतीच अपेक्षा नसणारं
फक्त भरभरून देणारं....
प्रेम असत बापाचं, सर्व ताकदीनिशी भक्कमपणे उभं राहणारं....
प्रेम असतं मैत्रीचं, शाश्वताच्याही पलीकडचं ...
