STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

प्रेम

प्रेम

1 min
249

प्रेम म्हणजे नक्की

असतं तरी काय? |

प्रश्न हाच प्रत्येकाला 

सतत छळत जाय | | १ | |


प्रेमा तुझा रंग हा

आहे तरी रे कसा? |

ज्याला जसा भावतो

तो साकारतो तसा | |२ | |


प्रेम म्हणजे प्रेमच

असे सर्वांचं सेम‌ |

प्रेमाविना जगणंच

कधी होतंय गेम | |३| |


प्रेम करावं तरी

कुणा, कुणावर? |

ताऱ्यांवर की शीतल 

वाहणाऱ्या वाऱ्यांवर? | |४| |


वृक्ष, पर्वत, नदी, पक्षी

सागर किनाऱ्यावर‌ ?

नाही तर तापमापीतल्या

चकाकत्या त्या पाऱ्यावर? | |५| |


प्रेम नाही फक्त एक

कपोलकल्पित कल्पना | 

मनाच्या सौंदर्यांची असते

अनोखी भव्य उपासना | |६| |


प्रेमात नसते जात- 

धर्म, नसतं नातं गोतं |

नसे वय, लिंगभेदही

स्वार्थाविना जे होतं | |७ | |


प्रेम करावं तर मनापासून 

नसावे ते कधीही वरकरणी |

रुसवे, फुगवे, भांडणतंटे सारं

विसरून व्हावी मनधरणी‌ | |८ | |


प्रेमात असावी खरी सहृदयता 

नको मुळीच बीभत्स वासना‌ | 

प्रेमात नको आसक्ति कुठलीच

हवी उरात मांगल्याची भावना | |९| |


नको राग, द्वेष, अहंपणा

वर्चस्वाची अती कामना |

प्रेम करा निरंतर व सत्य, सुंदर 

मांगल्याची ती करुन आराधना | |१०| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational