प्रेम म्हणजे काय!
प्रेम म्हणजे काय!
प्रेम म्हणजे मात्र शब्द नसतो
निखळ भावनांचा ठेवा असतो
मानवी ह्रदयाच्या गाभाऱ्यात
दडलेला दिव्य निर्झर असतो
मथुरेत देवकीचा पान्हा असतो
गोकुळी यशोदाचा कान्हा असतो
राधाचे प्रेम अपरीमीत समर्पण
मीराच्या प्रेमात त्याग असतो
वृंदावनात गुंजणारा कृष्णाचा
वेडावणारा वेणूनाद असतो
द्रौपदीने कृष्णाच्या बोटावर
बांधला जरतारी पदर असतो.
प्रेम म्हणजे मात्र प्रेमच असते
ते शब्दातून व्यक्त होत नसते

